महाराष्ट्र

गरजू महिलांसाठी नवीन योजना तयार करा

पत्रकार पंकज जोशी नागपुर

गरजू महिलांसाठी नवीन योजना तयार करा

सभापती श्रीमती सारिका नांदुरकर यांचे निर्देश

नागपूर, ता. ०६: महिला व बालकल्याण विशेष समितीची सभा मा. सभापती श्रीमती सारिका नांदुरकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. ०६) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृह येथे संपन्न झाली. यावेळी सभापती श्रीमती नांदुरकर यांनी गरजू महिलांकरिता नवीन योजना तयार करण्याचे निर्देश समाज विकास विभागाला दिले.

यावेळी समितीच्या उपसभापती श्रीमती तारा यादव, समिती सदस्य नगरसेविका श्रीमती चेतना निमजे, श्रीमती महेश्वरी बिसेन, श्रीमती रेखा निमजे, श्रीमती शिला तराळे, श्रीमती कल्पना द्रोणकर, कु. लक्ष्मी हत्तीठेले यांच्यासह समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे, समाज विकास विभागाचे श्री. विनय त्रिकोलवार, श्री. रितेश बांते, श्रीमती शारदा भुसारी, श्रीमती नुतन मोरे, श्री.रितेश बनसोड, यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

सभेत सभापती श्रीमती सारिका नांदुरकर यांनी झोन मध्ये असलेल्या समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून महिलांसाठी झोननुसार एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात याव्यात, व यात स्थानिक नगरसेविका तसेच पोलिस स्टेशनमधील महिला पोलिस अधिकारी यांना निमंत्रित करण्यात यावे, असे सुचविले. तसेच गरजू, विधवा व घटस्पोटीत महिलांना शिवण यंत्रांचे वाटप करण्यासाठी योजना तयार करावी, स्लम मधील गरजू महिलांना वाहन चालक प्रशिक्षण देता येईल काय यावर चाचपणी करावी आणि महिला दिनानिमित्त महिलांसाठी व सफाई कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले. महिलांसाठी नवीन योजना अधिक प्रभावीपणे राबविता येतील काय, यासाठी अधिकारी आणि समितीच्या सदस्यांनी योग्य त्या सूचना द्याव्यात असेही असेही त्यांनी बैठकीत सूचविले.

सभेत सर्वप्रथम समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी महिलांकरिता मनपाच्या विविध झोनमधील समुपदेशन केंद्र, शाळेतील मुलीकरिता सॅनिटरी नॅपकिन, महिलांसाठी शिवणयंत्र योजना, झोन निहाय पोटोबा फूड स्टॉल, महिला उद्योजिका मेळावा, बेघर निवारा, मुलीसाठी उपस्थिती भत्ता, बालवाडीच्या मुलांकरिता पोषण आहार, मनपा शाळेत विज्ञान लॅबचे नूतनीकरण, 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारे गणवेश, जोडे-मोजे वाटप, विद्यार्थ्याकरिता नि:शुल्क बस पास सुविधा, एमएसआयसीटी प्रशिक्षण, सीईटी, जेईई प्रशिक्षण, सोलर प्रशिक्षण, शिवणयंत्र क्लस्टर तसेच दिव्यांगासाठी चालविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button